सामाजिक

संविधान बचाव संघर्ष समीतीची लाखनी तालुका कार्यकारीणी गठीत

Spread the love

 

लाखनी – लोकशाहीप्रधान भारत देशात सत्ताधारी भाजप पक्षाने मनमर्जी कारभार चालविलेला आहे. खाजगीकरण , कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आरक्षण व रोजगार संपविण्याचा कट केंद्रातील भाजप सरकारने रचलेला आहे. सामान्य नागरीकांच्या संवैधानिक हक्क व अधिकारांचे उल्लंघन विदयमान सरकारकडून राजरोसपणे होत आहे. या सर्व गैरप्रकाराला आळा घालता यावा यासाठी सर्व जातीसमुहांमध्ये संविधानाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी व संविधानाचे संवर्धन करण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समीतीची निर्मिती करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात संविधान बचाव संघर्ष समीतीचे कार्य सुरू व्हावे या अनुषंगाने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कार्यकारीणी समीती गठीत करण्याचे योजले आहे. करीता भंडारा जिल्हायातील लाखनी तालुक्यात संविधान बचाव समीतीची लाखनी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आलेली आहे. सदर तालुका कार्यकारीणी २८ अॉक्टोंबर २०२३ रोजी बडगे सेलिब्रेशन सभागृहात संविधान बचाव संघर्ष समीती भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत गठीत करण्यात आली.
लाखनी तालुका कार्यकारीणी पुढीलप्रमाणे आहे
अध्यक्ष – नरेश इलमकर
उपाध्यक्ष – रोशन खोब्रागडे , निकेश मेश्राम
कार्याध्यक्ष – घनश्याम अतकरी
कोषाध्यक्ष – रूपेश नागलवाडे
महासचिव – सुरेंद्र बन्सोड ,
सचिव – मंगेश चांगले
सहसचिव – भरत मेश्राम , नामदेव काणेकर , राजेश गेडाम
मुख्य निमंत्रक – अश्विनी भिवगडे
मुख्य संयोजक- प्रा. उमेश सिंगनजुडे
प्रसिद्धीप्रमुख – अतुल नागदेवे
सहप्रसिद्धीप्रमुख – मदन कमाने
सदस्यगण – डॉ. वैष्णवी लेंडे , संगीता वाघाये , योगेश कांबळे , श्याम बाळबुद्धे , श्रीराम बोरकर , सदानंद वासानिक , ठकसेन मांढरे , सतीश टिचकुले , शर्मिला खंडारे , लतेश आवरकर , पंकज खांडेकर , पवन खांडेकर , विनय खांडेकर , अरूण कांबळे , मुलचंद मेश्राम , वेतन नंदेश्वर , युवराज गेडाम , रमाकांत बडगे , हिरालाल नंदेश्वर व योगीराज देशपांडे इ.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालान प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी मानले. संविधानाच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close