ती होणाऱ्या नवऱ्याच्या घरी गेली , समोर होणाऱ्या सासऱ्याला पाहून बुचकाळ्यात पडली

लग्नाचे वय झाल्यावर प्रत्येकाची इच्छा असते की तिला/ त्याला समजून घेणारा जोडीदार मिळावा. त्यामुळे तिचे / त्याचे आयुष्य आनंदात जाईल. अशीच स्वप्न लिसा ने देखील पाहिली होती. एका डेटिंग अँप वर तिची तरुणाशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना पसंत केले. त्यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. तो तिला घेऊन घरी गेला. पण भावी पतीच्या वडिलांना पाहून लिसा लां शॉक बसला. असे काय बघितले तिने तरुणाच्या वडिलांत की तिला एकदम शॉक बसला. चला तर जाणून घेऊ या काय आहे प्रकरण ?
इतर मुलींप्रमाणे आपणाला देखील समजून घेणारा आणि आपल्याशी प्रामाणिक असणारा जोडीदार मिळावा अशी लिसा ची इच्छा होती. त्यासाठी तिने चांगला लाईफ पार्टनर चा शोध सुरू केला होता. ती डेटिंग ऍपवर मनासारखा जोडीदार शोधत होती. .लिसा ला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला, ती त्याच्यासोबत खूप आनंदात होती. लग्न करून आपण आयुष्यभर त्याच्यासोबतच राहू असं स्वप्न ती पाहात होती. मात्र याचदरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे लिसा ला मोठा धक्का बसला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की या लिसा डेटिंग अॅपवर एका तरुणाशी ओळख झाली. आधी मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्या दोघांनी लग्नाबाबत विचार केला. लग्नापूर्वी हा तरुण प्रेयसील आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी घेऊन गेला. मात्र जेव्हा या लिसा ला आपल्या होणाऱ्या पतीच्या वडिलांना पाहिलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. काय करावं हे तिला कळेचना. लाजेनं तिची मान खाली गेली.
एका पॉडकास्टमध्ये तरुणीनं आपला हा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली की माझी आणि माझ्या जोडीदाराची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, त्यासाठी माझा पार्टनर मला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन गेला. मात्र जेव्हा मी त्याच्या वडिलांना पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण मी त्यांना एका क्रिसमस पार्टीमध्ये भेटले होते, ते माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे होते, मात्र दिसायला खूप सुंदर होते, म्हणून मी त्यांना प्रपोज देखील केलं होतं, काही काळ आम्ही एकमेकांना डेट देखील करत होतो, त्यानंतर मी आता त्यांच्या मुलाच्या प्रेमात पडले आहे. त्यांची भेट होताच मला माझा भूतकाळ आठवला, असं या मुलीनं म्हटलं आहे.