गुन्हेशाखा युनिट क्र. २ ची कामगिरी : घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक
नागपूर / प्रतिनिधी
दिनांक १७.०४.२०२३ ते दि. १२.०६.२०२३ दरम्यान फिर्यादी बेजिमीन थिओडोल सेमीयुल वय ५२ वर्षे रा. काटोल रोड, ३०५ ग्रेस अॅन्ड कोड, जयविघ्नहर्ता सोसा, पो. ठाणे गिट्टीखदान, यांची सासु रा. बी. ५९, एम बी स्टेट आकार नगर, पो. ठाणे गिट्टीखदान नागपूर शहर यांनी आपले घराला लॉक लाऊन बाहेर गावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराच्या मागील बाजुची खीडकी तोडुन आत प्रवेश करून घराचे आत ठेवलेले एक वन प्लस- ३२ ईची एल.ए.डी. टी.व्ही., एक जुना वापरता एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, एक टॉयटन कंपनीची घळी, एक सॅमसन
कंपनीचा टॅब, परदेशी चलनाच्या चार नोटा असे चोरून नेले वरून फिर्यादी यांनी रिपोर्ट दिल्या वरून पो. ठाणे गिट्टीखदान येथे कलम ४५४, ४५७, ३८० भा. दं. वी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता..
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून आरोपी १) राहुल आसीक पंचेश्वर वय १९ वर्ष रा. शास्त्री नगर सुरेद्रगड सरकारी दवाखाण्या जवळ गिटीखदान, २) एश्ली ईम्यलीओ फिलीप वय १९ वर्ष रा. कोलबा स्वामी कॉलनी, गुरूकुल स्कुल जवळ, ट्युलीप अपार्टमेंट, पोलीस ठाणे गिटीखदान यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी कडुन गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल किमती अंदाजे ४९,००० /- रु चा जप्त करून वर नमुद दोन्ही आरोपींना मुददेमालसह पुढील कारवाई करीता पो ठाणे गिट्टीखदान नागपूर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी मा. श्री मुम्मका सुदर्शन, मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि राहुल शिरे, सपोनि गजानन चांभारे, सपोनि तुषार काळेल, पोहवां संतोषसिंग ठाकुर, नापोअ गजानन कुबडे, कमलेश गणेर, प्रविण शेळके, महेद्र सडमाके, अर्जुन यादव पोअ सुरेश, आशिष धंदरे, सचिन बढिये, दिनेश डवरे यांनी केली.