ब्रेकिंग न्यूज

चांदोरी येथील नागरिकांनी अनुभवला ‘ द बर्निंग ‘ बस चा थरार

Spread the love
शिवशाही बस ने घेतला अचानक पेट ; बस चा झाला कोळसा
बस मध्ये 25 प्रवाशी करत होते प्रवास 
चांदोरी (नाशिक) / नवप्रहार मीडिया
          नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील नागरिकांनी ‘द बर्निंग ‘ बस चा थरार अनुभवला आहे. शिवशाही बस ने अचानक पेट घेतल्याची घटना निफाड तालुक्यातील चांदोरी गावाजवळ घडली आहे. या घटनेत बस चा पूर्ण कोळसा झाला आहे. बस मध्ये 25 प्रवाशी पडवास करत असल्याची चर्चाआहे.
 बसला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन समिती पथकातील सदस्यांनी
प्रवाशांना सुरखरूप बाहेर काढलं आहे, या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे. ज्या शिवशाही बसला आग लागली ती बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून
छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवशाही
बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत बस जळून खाक झाली, सुदैवानं
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. चालत्या बसनं अचानक पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला, स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकातील सदस्यांनी या बसमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ ही घटना घडली आहे. धावत्या बसनं अचानक पेट घेतल्यानं
प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत
कोणतीही जीवितहानी झाली नाही, बसमधील
सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर
 आलेलं नाहीये, या घटनेमुळे पुन्हा एकदा
अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close