सामाजिक

सायफळ येथील पाणी पुरवठा तिन दिवसापासून बंद जणतेला पाण्यासाठी करावी लागत आहे वणवण भटकंती.

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील सीमावर्ती भागात येणाऱ्या सायफळ येथे तिन दिवसापासून पाणी पुरवठा बंद असून याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे पैनगंगेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या सायफळ गावात मुबलक पाणी पुरवठा असणे आवश्यक असतांना मात्र येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सायफळ गावात ग्रामपंचायत पाणी पुरवठा व्यतिरिक्त पाण्याचे ईतर कोणत्याही प्रकारचे स्त्रोत नसल्याने येथील जनतेला ग्रामपंचायत पाणी पुरवठेवरच अवलंबून रहावे लागते गावाच्या बाजूला एक सार्वजनिक विहीर असून त्या विहीर मध्ये गेले अनेक महीण्यापासून पाणी सोडण्यात येत नसल्याने विहिरीमध्ये सुध्दा पाण्याचा थेंब नाही पाणी पुरवठा करण्यामध्ये सुध्दा दुजाभाव करीत असल्याचे दिसून येत आहे सरपंच पाणी पुरवठा कर्मचारी असलेल्या वार्डात दोन दोन तास पाणी पुरवठा करण्यात येते मात्र ईतर वार्डात दोन ते तिन दिवसाआड फक्त विस मिनिटे पाणी पुरवठा करण्यात असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा बाबत नियोजन नसल्याने गावात पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती सायफळ ग्रामपंचायत ची निर्माण झाली आहे गेले काही महिने अगोदर जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन चे काम करण्यात आले मात्र हे पाईप लाईन पाण्याअभावी खुचकामी ठरत आहे अजूनही सायफळ गावातील अनेक नागरीकांच्या घराकडे पाण्याचा थेंब सुध्दा पोहचत नसल्याचे दिसून येत आहे सायफळ ग्रामपंचायत मध्ये नव्याने निवडून आलेले सरपंच जनतेला मोठे आश्वासन दिले होते की गावात पाणी समस्या राहणार च नाही मात्र सदर सरपंच निवडून आल्यापासून गावात वारंवार पाण्याची टंचाई जाणवू लागले आहे मात्र याकडे सरपंच सचिव जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाणी समस्या सोडवावे अशी मागणी ग्रामस्थां कडून केली जात आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close