सुभद्रांगी बुद्ध विहार येथे रमाई आई जयंती साजरी झाली
वाडी प्रतिनिधी
आज दिनांक.०७/०२/२०२४ ला सायंकाळी ७:०० वाजता सुभद्रांगी बुद्धविहार महादेव नगर (लावा) येथ रमाई आई यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपण्ण झाला. बुद्ध मूर्तीला माल्यार्पण जोसना नितनावरे (सरपंच.ग्रा.प.लावा) यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांच प्रमणे कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे सुजित नितनवरे (माजी. उपसभापती प.स.नागपूर ), राजकुमार बोरकर (आध्यक्ष अस्मिता मंच वाडी), यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मल्यार्पण केले. चंदू तायडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सुजित नितनवरे (मा. पंचायत समिती उपसभापती,नागपूर), व कपिल खडसे (ग्राम पं. सदस्य लावा) यांनी सावित्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमा मधे दीपक सोनटक्के व त्यंची टीम आणि अर्चना ढोके यांनी रमाई आई यांच्या जीवनावर गाणे प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजकुमार बोरकर (अध्यक्ष अस्मिता मंच वाडी, नागपूर) यांनी सांगितले की माता रमाई यांच्या जीवनातील अनेक संघर्ष. बालपण आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात आल्यानंतर सामाजिक संघर्ष या अनेक विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला यशश्वी करण्या करिता आकाश पवार,धन्वंतरी भिवणकर (ग्राम.सदास्य.लावा) शुभांगी वैरागडे, श्रद्धा मेश्राम, गीता रोडगे, अश्विनी पिल्लेवान, प्रज्ञा रामटेके, गीता खोब्रागडे, प्रिया चौधरी, दर्शना गजभिये, मिनाक्षी साखरे, पाल ताई,सपना डहाके, प्रवीण मेश्राम, गौतम खोब्रागडे, सुरेश गजभिये, प्रदिप देवगडे, देवदत्त बागडे,मदन रामटेके, वामन गजभिये व ईतर सामाजिक कार्यकर्त्यानी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थीत होत्या .
सूत्रसंचालन:- उत्तम वैरागडे यानी केले. व आभार प्रादर्शन पुरु गोरे यानी केले.