भावाचा घटस्फोट होताच बहीण नवऱ्याला सोडून राहू लागली प्रियकरासोबत
भावाचा घटस्फोट होताच बहीण नवऱ्याला सोडून राहू लागली प्रियकरासोबत
चुरू ( राजस्थान ) / नवप्रहार डेस्क
काही राज्यात ज्या जुन्या चालीरीती आणि परंपरा आहेत त्यामुळे अनेकांना आपल्या ईच्छा आकांक्षा वर पाणी फेरावे लागते. राजस्थान मध्ये ‘ आटा साटा ‘ पद्धत ( भाऊ ज्या घरची मुलगी आणेल त्याच घरी बहीण देण्याची प्रथा आहे.) असल्याने एका तरुणीला आपल्या इच्छेवर पाणी फेरून भलत्याच व्यक्ती सोबत लग्न करावे लागले. पण भावाचा घटस्फोट होताच बहीण पतीला सोडुन प्रियकरा कडे आली.
एका महिलेनं भावाच्या घटस्फोटानंतर स्वतःचा नवरा सोडला. ती चार वर्षांपासून रामचंद्र नावाच्या व्यक्तीसोबत संपर्कात होती.ती आपल्या नवऱ्यामुळे समाधानी नव्हती आणि तिचं त्याच्याशी लग्न झाल्यापासूनच न पटल्याचं तिनं सांगितलं. नवरा सोडून ती तीन वर्षांनी प्रियकरासोबत राहायला गेली, पण तिला धमक्या मिळू लागल्या. अखेर तिनं पोलिसांकडे मदतीची मागणी केली.
चुरू जिल्ह्यातील कितासर गावातील महिला आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहायला गेली. रामचंद्र हा चुरू जिल्ह्यातील जिगानिया गावातील असून त्याचं राजलदेसर येथे शूजचं दुकान होतं. याच दुकानात महिलेची आणि रामचंद्रची पहिल्यांदा भेट झाली. त्या भेटीतून त्यांच्यात प्रेम फुललं. त्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली होती. पण महिलेचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरलं.
गायत्रीने सांगितलं की, तिचं लग्न ‘आटा-साटा’ प्रथेमुळे जिगानिया गावातील एका व्यक्तीसोबत ठरलं. ही प्रथा म्हणजे भावाच्या लग्नाच्या बदल्यात बहिणीचं लग्न ठरवलं जातं. मात्र, तिचा भाऊ आणि वहिनीचा नऊ महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर गायत्रीनं नवऱ्याचा घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी परतली.
गायत्री सांगते की, लग्नापासूनच ती नवऱ्यासोबत समाधानी नव्हती. कारण ती चार वर्षांपासून रामचंद्रसोबत संपर्कात होती. तिच्या कुटुंबानं तिचं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत केलं होतं. भाऊ घटस्फोटित झाल्यानंतर गायत्री पुन्हा रामचंद्रसोबत संपर्कात आली. तीन महिन्यांपूर्वी तिनं माहेरही सोडलं आणि दिल्लीला रामचंद्रसोबत राहायला गेली. पण आता त्यांना धमक्या मिळत असल्याने ते SP कार्यालयात सुरक्षा मागण्यासाठी पोहोचले आहेत.
गायत्री आणि रामचंद्र यांनी SP कार्यालयात पोहोचून संरक्षणाची मागणी केली. दोघं दिल्लीतील ओळखीच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यांच्या आयुष्याला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. गायत्रीच्या या निर्णयानं तिचं लग्न, कुटुंब आणि समाजासमोरील संघर्ष उघड झाला आहे. तिच्या कहाणीमुळे आता ‘आता-साता’ प्रथेवरही प्रश्न उपस्थित केले