दवाखान्यात रात्रीतून सुरू होता देहव्यापार


सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
कटिहार (बिहार) / नवप्रहार ब्युरो
बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील सदर इस्पितळातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात उपलब्ध माहिती नुसार येथील सुरक्षारक्षक नवीनकुमार सिंग यांना माहिती मिळाली होती की रुग्णालयाच्या परिसरात रात्रीच्या अंधारात अवैध काम सुरू आहे. नवीनसिंग यांनी पाळत ठेवली असता त्यांना दोन महिला संशयास्पद रित्या हालचाल करत असल्याचे दिसले.
याबाबत त्यांनी महिलाना विचारणा केली असता महिलांनी त्या देहव्यापार करत असून रुग्णालय हे ठिकाण सुरक्षित असल्याने त्यांनी यासाठी रुग्णालयाला पसंती दिली.
या दोन्ही महिला सालमारी व बारसाई येथील रहिवासी आहेत. त्या आंबटशौकीन ग्राहकांकडून ३०० ते ५०० रु. घेऊन त्यांना आपले शरीर उपलब्ध करून देत होती.रोज तीन ते चार लोकांसोबत या महिला शारीरिक संबंध ठेवत होत्या.
एक महिला रुग्णालयात कामावर – नवीनसिंग यांना शंका होती की हा सगळा गैरप्रकार रुग्णालयातील लोकांच्या सहयोगाशिवाय शक्य नाही. चौकशीत पकडल्या गेलेल्या महिलेपैकी एक महिला त्याच रुग्णालयात कामावर होती. असे समोर आले आहे.
पोलिसांनी सुरू केली चौकशी – या दोन्ही महिलाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस हे माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे की शहरात देहव्यापाराचे रॅकेट तर नाही ? आणि याप्रमाणे आणखी कुठे गैर प्रकार सुरू होता काय ?
पहिलेच बदनाम आहे सदर रुग्णालय – सदर रुग्णालय हे आपल्या करणाम्याने आणि अव्यवस्थेमुळे आधीच बदनाम आहे.अश्यातच हा गैरप्रकार समोर आल्याने रुग्णालयाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे.




