ब्रेकिंग न्यूज

तालुक्यातील खेड शेत शिवारात गोळीबार सुदैवाने जीवित हानी नाही

Spread the love

मोर्शी / संजय गारपवार

मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील खेड शेत शिवारामध्ये धुर्‍यावरील दगड सरकल्याच्या वादावरून बारा बोर बंदुकीतून आरोपीने गोळीबार केला यामध्ये शेतात कामावर असलेल्या महिला मजुराच्या काना जोडून सदर गोळी निघून गेली घाबरलेल्या परिस्थितीत पेरणी करता आलेले शेतमजूर व मालक हे सैरावैरा पडून त्यांनी आपला जीव वाचविला
प्राप्त माहितीनुसार आरोपी संजय ओंकारसिंह जनकवार ( ठाकुर ) वय 50 रा. खेड ता. मोर्शी यांच्या शेताला लागून असलेले अमोल अशोकसिंह जनकवार ( ठाकुर ) वय 32 रा. खेड यांच्या शेतामध्ये आज दि. 29 जून 23 गुरवार ला सकाळी 10 वाजता पेरणी सुरू असताना पेरणीच्या ट्रॅक्टरने धुर्‍यावर असलेला दगड सरकला त्यामुळे आरोपी संजय जनकवार व फिर्यादी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली या बाचाबाची चे रूपांतर गोळीबारात झाले गोळीबार करणाऱ्या आरोपीकडे 12 बोर बंदुकीचे लायसन असल्याने त्याने अमोल अशोकसिंह जनकवार यांच्यावर बंदुकीतून दोन फायरिंग केले त्यापैकी एक गोळी शेतात कामावर असलेल्या महिलांच्या काना जोडून गेली जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने गोळीबार केला असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे सुदैवाने या गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नाही
सदर घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश ठेवले पोलीस नाईक सुमित पिढेकर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून सदर प्रकरणात भादवि कलम 307, 504 , 506 नुसार मोर्शी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनात मोर्शी पोलीस करीत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close