तीन दिवसाच्या पावसाने धामोडी गावच्या मुख्य रस्त्याची झाली दुरावस्था
रपट्याचे काम सुरू असल्याने वाहनांना करावा लागतो चिखलातून प्रवास
दर्यापूर(ता.प्रतिनिधी)– दर्यापूर तालुक्यातील सर्वच भागात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पावसाने आगमन झाले आहे.त्यामुळे अनेक गावात मुख्य रस्त्यावरील रपटा व रस्त्याचे काम सुरू असल्याने बाजूच्या खुल्या जागेतून रोड वाहतुकीसाठी काढण्यात आल्याने या पावसाने त्या भागातून प्रवास करताना चिखल तुडवत वाहनांना जावे लागत आहे.
अशाच प्रकारे तालुक्यातील धामोडी गावच्या मुख्य रस्त्याची सुद्धा या पावसाने दुरवस्था झाली आहे.शेतकऱ्यांना व नागरिकांना शेतात व दर्यापूर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.गावाच्या या मुख्य रोडवरील रपट्याचे काम सुरू असल्याने वाहनांना चिखलातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
तरी या रोडवर मुरूम टाकून रस्ता पुर्वरत करावा अशी मागणी गावचे सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील गावंडे यांनी केली आहे.