राज्य/देश

अमेरिकेला राहून ती उचलत होती भारतातून  पगार 

Spread the love

बनासकांठा ( गुजरात ) / नवप्रहार डेस्क

               मेलेल्या व्यक्तीच्या नावावर राशन किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्याची अनेक प्रकरणे समोर येतात. किंवा बनावटी सर्टिफिकेट च्या नावावर सरकारी नोकरी लाटल्याच्या घटना उजेडात येतात. पण अमेरिकेत राहून मागील आठ वर्षापासून सरकारी शाळेतून पगार उचलत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

भावनाबेन पटेल असे या महिला शिक्षिकेचे नाव असून अमेरिकेला जाण्यापूर्वी बनासकांठामधील अंबाजीतील पंच प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. 2013 मध्ये त्या अमेरिकेतील शिकागो शहरात कायमस्वरूपी वास्तव्यास गेल्या. भावनाबेन यांच्या कडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड देखील आहे. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून त्या एकही दिवस शाळेत आलेल्या नाहित, तरीही अद्याप त्यांचे नाव शाळेच्या रोस्टरवर आहे. शाळेच्या प्रभारी शिक्षिका, पारुलबेन यांनी भावनाबेन 2013 मध्येच अमेरिकेत स्थलांतरित झाल्या असल्याचे सांगितले.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृच्चानुसार भावनाबेन वर्षातून एकदाच दिवाळी दरम्यान गुजरातला येतात, यावेळी शाळा बंद असते. या काळातही त्या शाळेत जात नाहित किंवा मुलांशी देखील कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाहित. हि बाब शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच याबाबत त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

किमान दोन वर्षांपासून भावनाबेन यांना शाळेत पाहिले नसल्याचे विद्यार्थ्यांनी देखील सांगितले. जानेवारी 2023 मध्ये त्यांनी शाळेला शेवटची भेट दिली होती आणि वर्षाच्या सुरुवातीपासूनचं त्या विनावेतन रजेवर गेल्या होत्या. तक्रारीनंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी भावनाबेन पटेल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close