Uncategorized

खैरी शेतशिवारात अज्ञाताने ७ एकाराची सोयाबीन गंजी पेटवली

Spread the love

अचलपूर प्रतिनिधी-

अडीच लाखाचे नुकसान ! असेगाव ठाण्यात गुन्हा दाखल#

अचलपूर प्रतिनिधी
अचलपुर :-अचलपूर तालुक्यातील खरी धनोडा फाट्यावर असलेल्या खैरी येथील अजय काळे काळे यांच्या शेतातील काढणी झालेल्या सात एकर सोयाबीनची गंजी अज्ञात दोन समाजकंटकांनी पेट्रोल टाकून पेटवून दिली पेटवली यात सदा शेतकऱ्याचे अडीच लाखाचे नुकसान
प्राप्त माहितीनुसार माहितीनुसार अचलपूर तालुक्यातील खैरी येथील प्रगतशील शेतकरी अजय काळे यांचे आसेगाव दर्यापूर रोडवर सावळापुर फाट्याजवळ गट क्रमांक 81 मधील मध्ये पत्नी व त्यांच्या नावे असलेल्या शेतात सोयाबीन पेरले होते ते सोयाबीन दोन दिवस पूर्वी काढून त्याची गंजी मारण्यात आली होती . रविवार रोजी या सात एकरातील 40 क्विंटल सोयाबीन काढण्यात आले उरलेले सोयाबीनची गंजी रात्र झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काढण्यात येणार होते परंतू अज्ञात समाज कंटकाने ही अर्धवट काढलेली सोयाबीन गंजी पेट्रोल टाकुन रात्रीच्या सुमारास पेटून दिली . शेताला लागुनच असलेल्या विजवितरण कंपणी च्या पावर हाऊस मधील डयुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आग दिसता च त्यांनी सदर शेतकर्‍या ला माहिती दिली . त्याच वेळी दोन इसम मोटर सायकल ने पळून जातांना दिसले .
खैरी (दनोडा ) गावात माहीती होताच अनेक शेतकरी आग विझवाय ला पोहचले पंरंतु आग एवढी भयंकर होती की त्यात ५० किंटल सोयाबीन व सोयाबीन भरण्या साठी आणलेला ८० पोते बारदाना तडव व इतर साहित्य जळून खाक झाले .
सदर घटना घडताच आसेगाव पोलीसांना माहीती देण्यात आली पोलिसांनी घटना स्थळ गाठत आरोपींचा शोध घेत आहे प्रगतशिल शेतकरी म्हणुन सर्वत्र ओळख असलेला शेतकर्‍या चे असे नुकसान करणारा समाज कंटकांना तातकाळ अटक करण्याची मागणी होत आहे .
( माझे सात एकरात सोयाबीन होते . हे सोयाबीन काठणे सुरू होते पहीला दिवशी ४० किंटल सोयाबीन काढले जवळपास ५० पोते काढायचे होते . रात्र झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी काढू परंतु रात्रीच कोणीतरी गंजी पेटवली यात माझे अडीच लाखाचे नुकसान झाले . अजय काळे खैरी )

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close