क्राइम

महिलेचे जबरदस्तीने लग्न आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींना शिक्षा

Spread the love

महिलेचे जबरदस्तीने लग्न आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींना २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा 

नागपूर / विशेष प्रतिनिधी

कॅटरिंग च्या कामाचे आमिष दाखवून तिची जयपूर येथे नेऊन जबरदस्तीने लग्न लावून देणाऱ्या आणि तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या सहा आरोपीं पैकी चार आरोपींना  न्यायालयाने २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अशोक बद्रीप्रसाद शर्मा, संजय मदनलाल पारिख, विजय कल्याणमलजी सोनी आणि मुकेशकुमार रामेश्वर जाखड यांना प्रत्येकी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश जे. सी. यादव यांनी हा निकाल दिला.

पीडित महिला रायपूर येथे कॅटरिंगचे काम करीत होती. या दरम्यान तिची रिया सोमकुवर आणि अनू खान यांच्याशी ओळख झाली. अनू खानने जयपूर येथे कॅटरिंगचे काम असल्याचे सांगून २० सप्टेंबर २०२१ रोजी तिला नागपूरला बोलावले. बहिणीसह नागपूरला आल्यानंतर ती काही दिवस अनू खानच्या घरी राहिली. २७ सप्टेंबरच्या रात्री अनू खान आणि सलमान ऊर्फ करण शेख यांनी तिला जयपूरला नेले. तेथे एका हॉटेलमध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. तिने विरोध केला असता हॉटेलसह इतर खर्चाचा हवाला देत तिच्यावर दबाव टाकण्यात आला. लग्नाला नकार दिल्यास मारहाण करून अडचणीत आणण्याची धमकी देण्यात आल्याने तिने भीतीपोटी होकार दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

तिचे संजय नावाच्या व्यक्तीसोबत लग्न लावून एका गावात नेण्यात आले. तेथे संजयने जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला. पुढे तिला अशोक शर्मा याच्याकडे नेण्यात आले. तेथेही लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने जबानीत नमूद केले. त्यानंतर तिचे इच्छेविरुद्ध पुन्हा लग्न लावण्यात आल्याचा आरोप आहे. राज्य सरकारतर्फे ॲड. रश्मी खापर्डे यांनी बाजू मांडली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close