क्राइम

नराधम शिक्षकाकडून तीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण 

Spread the love

अंबरनाथ / विशेष प्रतिनिधी

                       मागील काही काळापासून राज्यात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणांच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही ठिकाणी अश्या नराधम शिक्षकांना जनतेकडून चोप दिला जात आहे. पोलीस असल्या नाराधमांवर कायदेशीर कारवाई देखील करत आहेत. पण अश्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. अबरनाथ शहरातील दक्षिण भागात असलेल्या एका खाजगी शाळेत जी घटना घडली आहे.

 धक्कादायक बाब म्हणजे लैगिंक शोषणाचे मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलांचे वारंवार लैगिंक शोषण करत असल्याचेही समोर आले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बेडया ठोकल्या आहेत. जेम्स जोसेफ शेराव असे अटक नराधम शिक्षकाचं नाव आहे.

अधिकची माहिती अशी की, अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत गरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एका सामाजिक संस्थेमार्फत ही शाळा सुरू आहे. या शाळेत नराधम जेम्स शिक्षक असून . या शाळेत या भागातील सर्वसामान्य गरीब अल्पवयीन विध्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून नराधम शिक्षक शाळेतील 14 ते 7 वर्षीय अल्पवीयन विद्यार्थ्यांकडून शाळेतच वर्गामध्ये अंगावरील कपडे काढून मालिश तेल करू घेत त्यांचे लैगिक शोषण करीत होता.

पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलीस तपासात समोर

नराधम शिक्षकाकडून वारंवार लैंगिक छळ होत असल्याने पीडित मुलांनी शाळेत जाणे बंद केलं होत.मुलं शाळेत का येत नाही म्हणून शाळा संचालकाने त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे नराधम उघड्या अंगावर पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

शिक्षकाला न्यायालयात हजर केले, 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, पीडित मुलांच्या पालकांनी 6 डिसेंबर रोजी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठत मुलांवर घडलेला प्रसंग कथन करताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायदयानुसार गुन्हा दाखल करत नराधमाला काही तासातच अटक केली आहे. आज नराधम शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close