राजकिय

फडणवीस शिंदे बद्दल घेऊ शकतात हा मोठा निर्णय 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

                     राज्यात घवघवीत यश मिळवत महायुती ने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापनेच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज सल्ल्याची चर्चा होती. पण शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत यावर पूर्णविराम लावला. त्यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठीपुढे काही महत्वाची खाती मिळावी यासाठी आग्रह धरला होता असे समजते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांच्या काळात मोठी छाप पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दुसर्‍या टर्ममध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. तसंच रुसवे-फुगवे झाल्यानंतरही भाजपकडून त्यांना गृहखातं आणि नगरविकासही सोडले जाण्याची शक्यता कमीच आहे. या ‘नाराजीनाट्या’ नंतर आता महायुती सरकारच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

 

 

गेले काही दिवस रुसवे-फुगव्याचं राजकारण अनुभवल्यानंतरही भाजपकडून त्यांना गृहखातं आणि नगरविकासही सोडले जाण्याची शक्यता कमीच आहे. पण आमदार, कार्यकर्ते आणि स्वत:फडणवीसांनी मनधरणी केल्यामुळे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहे. त्यांच्या चेहर्‍यावरील नाराजी लपून राहिलेली नाही.या नाराजीनाट्यानंतर आता महायुती सरकारच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस  हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2022 राज्यात भाजपला पुन्हा ज्यांच्यामुळे सत्तेत एन्ट्री मिळाली, त्या शिंदेंसाठी खुद्द फडणवीस हे मोठा त्याग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शनिवारी(ता.7) सुरू झालं आहे. हे अधिवेशन 7,8 आणि 9 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतींची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

प्रोटोकॉलनुसार विधानभवन आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचं मुख्य नेतेपद हे मुख्यमंत्र्‍यांकडे असते.पण महायुती सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे.विधान परिषदेचं सभागृह नेतेपद देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे एक नंबरचे नेते आहेत. तर एकनाथ शिंदे हे दोन नंबर आणि अजित पवार हे तीन नंबरचे नेते मानले जातात. शपथविधी सोहळ्यातही अशाच क्रमाने या तीनही नेत्यांनी शपथ घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे फडणवीस हे शिंदेंकडे विधान परिषदेच्या सभागृहाचं कामकाज सोपवण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आगामी काळात मोठी आव्हानं असणार आहे. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज पाहताना त्यांना तारेवरची कसरत लागणार हे नक्की आहे. त्याचमुळे कामकाज करणं सोपं जावं यासाठी फडणवीस शिंदेंना थेट विधान परिषदेच्या सभागृहाचं मुख्यनेतेपद देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close