हँड पंप 6 महिन्यांपासून बंद, नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा!
नव- प्रहार / प्रतिनिशी
हंसराज
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ गाव वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून खराब पडलेला हँडपंप दुरुस्त करण्याची सतत मागणी करत आहेत. तसेच गावात लावलेला सोलर नळ देखील बंद आहे आणि त्यातून पाणी येत नसल्याने ग्रामवाशी यांची मोठी फजिती निर्माण होत आहे. तसेच गावात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी या बाबत ग्रामपंचायतीशी संपर्क साधला, परंतु वॉर्ड सदस्यांनी या समस्येवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
या समस्येवर लवकर तोडगा काढण्यासाठी, वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी 13 जून रोजी कलेक्टर कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खंड विकास अधिकारी यांना निवेदन दिले.
परंतु, अद्याप प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन या समस्येची दखल घेतली नाही आणि निराकरण सुद्धा केले नाही.
वॉर्ड क्र.2 पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
गावातील नागरिकांनी तक्रार केली आहे की, हातपंप बंद झाल्याने त्यांना पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी लांबून आणावे लागत आहे. यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होत आहे. या समस्येचा विशेषतः मुले आणि वृद्धांवर जास्त त्रास होत आहे.
*कचऱ्याच्या विल्हेवाटीमुळे प्रदूषण आणि आरोग्य समस्या:*
गावात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने सर्वत्र गंदगी पसरली आहे. ज्यामुळे दुर्गंध होत आहे आणि आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. या कचऱ्यातून पसरणारे मच्छर आणि किटक रोगांना कारणीभूत ठरत आहेत आणि याचा त्रास विशेषतः मुले आणि वृद्धांना होत आहे.
*तातडीच्या उपाययोजनांची गरज:*
ग्रामस्थांनी पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
जर प्रशासन याकडे लक्ष घालत नसेल तर
यामुळे चिंतित झालेल्या ग्रामवाशांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आता सर्वांचे लक्ष निवासी राजीराम इस्तारी कांबळे यांच्या घरासमोर असलेल्या हँडपंपाच्या दुरुस्तीकडे लागलेल्या आहेत.
गावातल्या नागरिकांच्या मनात प्रश्न पडला आहे की काय गावातील समशा दूर होणार का? पाणी आम्हाला मिळणार का? प्रशासन या कडे लक्ष घालणार का? या सारखे अनेक प्रश्न गावकरी आता करत असताना दिसत आहेत.