पूजेसाठी गेलेली महिला नदीत वाहून गेली

पाळा शिवारात आढळला मृतदेह
मोर्शी ( तालुका प्रतिनिधी)दि.२२ जुलै
सालबर्डी येथून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे.अधिकमास निमित्त पूजेसाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरल्याने ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहे. तिचा मृतदेह पाळा शिवारात आढळला आहे.महिलेचे नाव लक्ष्मी बाळू उबणारे ४० रा.सालबर्डी असे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अधिक मास प्रारंभ झाल्याने बहुसंख महिला नदीची पूजा अर्चना करण्याकरिता शनिवारी सकाळी माळू आणि गंगा नदीच्या संगमावर गेली असता पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली.सदर मृतक महिलेचे नाव लक्ष्मी बाळू उबणारे वय ४० राहणार सालबर्डी असे आहे. सदर महिलेचा मृतदेह हा माळून नदीच्या पात्रात पाळा शिवारात आढळून आला. याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना मिळतात पोलीस अंमलदार पंकज साबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर शव दुपारी शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मृतक महिलेला पती व दोन मुले आहे.फिर्यादी मृतक महिलेच्या पती ने दिलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे .