सारडा महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग यशस्वी रित्या संपन्न
अंजनगाव सुर्जी 🙁 मनोहर मुरकुटे )
स्थानिक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने दिनांक १२ जून २०२३ ते २१ जून २०२३ या कालावधीत मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेला होता.
दिनांक २२ जुन रोजी पुराभिलेखागर संचालनालय, मुंबई इथून आलेले अभिलेखाधिकारी मनोज राजपूत यांच्या नेतृत्वात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ३६ विद्यार्थी परीक्षेला हजर होते, अतिशय शांततेत परीक्षा पार पडली.
या संपूर्ण प्रशिक्षण वर्गाकरिता अमोल महल्ले व लक्ष्मण भिसे, पुराभिलेखागार, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे धडे गिरविले. संपूर्ण प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बशिष्ठ चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डॉ नितीन सराफ, प्राध्यापक, इतिहास विभाग यांनी कार्य केले.