क्राइम

प्रेयसी वर बलात्कार करून गळा दाबून हत्या 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

बलात्कार करून प्रेयसीचा गळा दाबून करण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील उमरड येथे उघडकीस आली. मृत युवती २५ वयाची असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीए द्वितीय वर्षाला असलेली ही युवती रविवारी सकाळी नऊचे सुमारास महाविद्यालयीन शिबिरासाठी गेली होती. साडेसहा वाजता तिची आई घरी आली तेव्हा ती घरी नव्हती, आईने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मी ब्रह्मपुरीत आहे आज रात्री घरी येणार नाही असे तिने आईला सांगितले. त्यानंतर एका युवकाने मोबाईल घेतला मी तुमच्या मुलीला परत पाठवणार नाही असे तो म्हणाला.

दरम्‍यान उमरेडमधील एमआयडीसी बस थांबा परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आढळलेल्या दस्तऐवजावरून संबधित युवतीची ओळख पटली. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आरतीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता ती एका युवकाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचे लोकेशन आधारे नागपूरला शोध घेतला मात्र संबधित युवक मिळाला नाही. अखेर त्याला चंद्रपुरातून अटक करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close