शेतीमध्ये क्रांती करणारा निघोज येथील आदर्श शेतकरी राहुल रसाळ . प्राचार्य डॉ आहेर
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – निघोज सारख्या ग्रामीण भागात शेतीमध्ये क्रांती करून विविध उपक्रम राबवणारे आदर्श शेतकरी राहुल अमृता रसाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सहदेव आहेर यांनी केले आहे .
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालय येथे आदर्श शेतकरी राहुल अमृता रसाळ यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने २०२४ चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार दिला आहे . याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सहदेव आहेर उपस्थित होते.
यावेळी आदर्श व उपक्रमशिल शेतकरी राहुल रसाळ म्हणाले की,आधुनिक जगात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. जीवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे ,म्हणून शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हटले जाते .
भारत हा शेती प्रधान देश असून शेतीच्या सहाय्याने आपल्याला क्रांती करता येते, त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून रासायनिक शेती आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, असे प्रतिपादन ही त्यांनी केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की, उत्तम व आदर्श शेती कशी करावी, याचे प्रत्यक्ष व उत्तम उदाहरण म्हणजे राहुल रसाळ आहेत. त्यांनी शेती क्षेत्रात केलेली क्रांती उल्लेखनीय आहे, असे ही प्राचार्य डॉ . आहेर यांनी गुण गौरवात सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, डॉ. प्रविण जाधव, डॉ. दुर्गा रायकर, डॉ. पोपट पठारे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा. संगीता मांडगे, प्रा. आनंद पाटेकर, प्रा. स्वाती मोरे, प्रा. सचिन निघूट, प्रा. नीलिमा घुले, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधाक्ते, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. वृषाली जगदाळे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. अश्विनी सुपेकर, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. अशोक कवडे, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. संदीप लंके, श्री. नवनाथ घोगरे, श्री. अक्षय घेमुड, श्री. किशोर बाबर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद पाटेकर यांनी केले तर आभार डॉ. मनोहर एरंडे यांनी मानले .