सलग दुसऱ्या दिवशीही टँकर द्वारे पाणी वाटप
पंचायत समिती सदस्य भाग्यश्री कांबळे यांचा पुढाकार
जवाहरनगर: जल जीवन मिशन अंतर्गत सावरी – इंदिरानगरनगर येथे सुरू असलेल्या कामामुळे जुन्या जलवाहिन्याची (पाईपलाईन) ठीक ठिकाणी तुट-फूट होऊन नाल्या व रस्ते जलमग्न झाले असून फुटलेल्या पाईप लाईन मुळे, चार दिवसापासून नागरिक पाण्याविना दारोदार भटकंती करीत असताना ही समस्या पंचायत समिती सदस्या भाग्यश्री मोहनिष कांबळे यांचे कडे नागरिकांनी पाण्याची कैफियत मांडली . यातून तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे यांचे पुढाकाराने
इंदिरानगर सावरी येथील नागरिकाना मुबलक पाणी पुरवठा मिळण्याकरिता सलग दुसऱ्याही दिवशी टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.यावेळी ग्रामंचायत सदस्य रिया अनुप कांबळे उपस्थित होत्या.नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्या बद्दल इंदिरानगर सावरी वासियानी प. स.सदस्या भाग्यश्री कांबळे जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे, ग्राम पंचायत सदस्य रिया कांबळे यांचे आभार मानले आहे
………….