क्राइम

प्रियकराचा लग्नास नकार प्रेयसीने गुप्तांग छाटले 

Spread the love
मुंबई / विशेष प्रतिनिधी 

 
              त्यांचे मागील सात – आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाब टाकत होती.पण तो दोन मुलांचा बाप असल्याने लग्नास नकार देत होता. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने त्याला नववर्षाच्या पूर्व संध्येला घरी बोलावले आणि त्याचे गुप्तांग छाटले.या घटनेने सांताक्रुझ परिसर हादरला. कालिना येथील जांभळीपाडा भागात हा प्रकार घडला असून जोगिंदर महतो (वय 44) असं प्रियकराचं नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय प्रेयसी कंचनदेवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
नेमकं घडलं काय?

जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला मुलं देखील आहेत. मात्र, त्याचे कंचनदेवी महतो हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कंचनदेवीने गेल्या काही काळापासून पत्नीला सोडून तिच्याशी विवाह करण्याचा तगादा लावला हता. त्यासाठी ती सातत्याने दबाव टाकत होती. त्यामुळे जोगिंदरच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे तो नोव्हेंबर 2025 मध्ये गावी बिहारला निघून गेला होता.
कंचनदेवीची धमकी आणि…

कंचनदेवी नेहमीच जोगिंदरला फोन करून मुंबईत परत येण्याची आणि तिच्याशी लग्न करण्याची धमकी देत होती. 19 डिसेंबरला जोगिंदर मुंबईत आला आणि 24 डिसेंबरला कंचनदेवीला भेटला. त्याने तिला समजावून सांगितले की त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. पण कंचनदेवी त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काहीही न ऐकता ती त्याच्यावर दबाव टाकत होती.
नवीन वर्षाच्या निमित्ताने बोलावलं अन्…

1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या निमित्ताने कंचनदेवीने जोगिंदरला घरी बोलावले. जोगिंदर तिच्या घरी पोहोचताच तिने त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग छाटले. जोगिंदर रक्तबंबाळ अवस्थेत तिथून निघून आपल्या घरकुलाकडे गेला. जिथे त्याच्या मुलांनी त्याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्या जखमा गंभीर असल्याने त्याला सायन रुग्णालयात हलवले गेले. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close