आ. रवींद्र धंगेकर यांच्या पुढे उभे आहे पक्षांतर्गत आव्हान
पुणे / नवप्रहार डेस्क
निववडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती कडून तिकीट मिळविण्यास इच्छुक उमेदवारांनी आपली फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. विद्यमान आमदारांना सर्वच पक्षांनी तिकीट देण्याचे ठरवले आहे. पण काही आमदारांना पक्षांतर्गत विरोध होग असल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर हे त्यापैकी एक .
पुण्यातील विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून एक महिला कॉंग्रेसच्या नेत्याने विधानसभा निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला याआधी देखील स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे कसब्यातील महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच अजूनही कायम आहे. अशातच कॉंग्रेसच्या महिला नेत्या कमल व्यवहारे यांनी अलिकडेच संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली आहे. त्यांनी याआधी विधानसभा निवडणूक लढविण्याची देखील इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच त्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून इच्छूक आहेत.
कमल व्यवहारे यांचं कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात चांगलं संघटन राहिले आहे. त्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून पुण्याच्या पहिला महिला महापौर होण्याचा मान देखील त्यांच्याच नावावर आहे. यातच ४० वर्षांपासून मी कॉंग्रेसची सदस्य राहिलेली आहे. यंदा परिवर्तन करणार आणि निवडणूक लढवणारच, असा निर्धार करत त्यांनी विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. परंतु कोणत्या पक्षात जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अलिकडेच ‘परिवर्तन महाशक्ती’ च्या नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. यादरम्यान कमल व्यवहारे यांनी संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आमच्या पक्षाचे खासदार, तर संभाजीराजे आणि आम्ही एकाच संस्थेत काम करतो, त्यासंदर्भात ही भेट होती. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कमल व्यवहारे नेमकी काय भूमिका घेणार ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.