Uncategorized

पंक्चर दुरुस्त करतांना ट्यूब फुटला अन….

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया .

                    सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही तर असे असतात किंते पाहून हसावं की रडावं हेच समजत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊ या  काय आहे या व्हिडिओत.

आता असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो पाहून युजर हैराण होत आहेत. अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे, तर काही लोकांना तो गंमतीदार वाटत आहे, त्यामुळे या व्हिडीओला वारंवार पाहीले जात आहे.

सोशल मिडीआवरील इंस्टाग्रामच्या पेजवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात व्हिडीओत एक टायर पंक्चर काढण्याचे दुकान दिसत आहे. या दुकानात काही कर्मचारी मोठ्या ट्रकचा टायर पंक्चर काढण्याचे काम करीत आहेत. तेव्हा अचानक या मोठ्या टायरमधील ट्युबचा ब्लास्ट होऊन कर्मचारी हवेत उडाल्याचे दिसत आहे. हा खतरनाक प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाल्याचे दिसत आहेत.

या व्हिडीओत आपण पाहू शकता की एक टायर पंक्चर काढण्याचे मोठे गॅरेज दिसत आहे. तिथे एका मोठ्या ट्रकचे टायरला काही लोक उचलून त्याची दुरुस्ती करताना दिसत आहे. परंतू दुसऱ्या क्षणाला या टायरमधील ट्युब अचानक फुटते. आणि त्यातून वेगाने आलेल्या हवेच्या प्रेशरने टायरसह दोन-तीन कर्मचारी चक्क हवेत उडाल्याचे दिसत आहे.

इंस्टाग्रामवर या व्हिडीओला bogor.gembira नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओला सात कोटी वेळा पाहण्यात आले आहे. तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केले आहे. एका युजरने लिहीले आहे की या क्लिपला अनेकवेळा पाहत आहे. दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की हे कसे झाले? या व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतंय ?

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close