हटके

प्रेम लग्न आणि त्यानंतर मित्रा सोबत शैय्या सोबत करण्यास पाडले भाग 

Spread the love

कोल्हापूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     महिलेशी प्रेम करून तिच्यासोबत लग्न केल्यावर तिला मित्रासोबत शैय्यासोबात करण्यास भाग पाडणाऱ्या नवरा आणि मित्रावर  गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पीडितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेची आरोपीशी २०१८ मध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न केले. लग्नानंतर पीडितेला आपल्या कर्नाटकातील घरी नेले. तेथे पीडितेला व आरोपीच्या पत्नीने व आईने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला वेगळ्या ठिकाणी रूम करून ठेवले. त्यानंतर एके दिवशी आरोपीचा मित्र पीडितेच्या घरी येऊन पीडितेशी जबरदस्ती करू लागला. तेव्हा पीडितेने आरोपीला फोन केल्यानंतर ‘हमारी जमात मे ये सब चलता है, वो जैसा बोल रहा है वैसा कर’ म्हणत फोन कट केला. त्यानंतर आरोपीच्या मित्राने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेला व मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडिता ही सोलापुरात आल्यानंतर याबाबतची फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close