शेकोटी ठरली सहा लोकांच्या चितेचे कारण , दोन वेगवेगळ्या घटनेत सहा लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
डा परिसरात एका घरात ४ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातून पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. दरवाजा आतून बंद होता. खोलीत शेकोटी पेटलेली होती. प्राथमिक तपासानुसार, कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी चुली पेटवली असावी. धुरामुळे गुदमरून सर्वांचा मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. या चार जणांपैकी दोन लहान मुलांचाही समावेश आहे. एका मुलाचे वय ७ वर्षे, तर दुसऱ्याचे वय ८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
थँडीपासून वाचण्यासाठी या कुटुंबाने घरात शेकोटी पेटवली. शेकोटीमुळे काही वेळासाठी त्यांना उब मिळाल्याने दिलासा मिळाला पण, त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल की ही रात्र त्यांच्यासाठी अखेरची रात्र ठरेल. दरम्यान खोलीत धुराचे लोट उठू लागले. यानंतर या चौघांचाही मृत्यू झाला.
बराच वेळ घरात कुठलीही हालचाल झाली नाही. कुटुंबातील कुणीही दिसलं नाही, तेव्हा शेजारच्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला. तर समोर चौघांचे मृतदेह दिसून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. अशीच आणखी एक दुर्घटना इंद्रपुरी परिसरात घडली. तिथे शेकोटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.