क्राइम

परदेशात गेलेल्या पतीचा मृतदेह सात दिवसांनी निघाला जमिनीतून 

Spread the love

भुसावळ  /प्रतिनिधी

                    पोलिस रेकॉर्डवर गुन्हेगार असलेल्या तरुणांची हत्या करून त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता.परिसरात दुर्गंधी पसरल्यावर आणि नागरिकांनी तक्रार केल्यावर ही घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे याबद्दल मृतकाच्या बायकोला विचारणा केल्यावर तिने पती परदेशात गेल्याचे म्हटले होते.
 भुसावळमध्ये एका गुन्हेगार तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. होळीच्या दिवशी या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह हा जमिनीत गाडला होता. ७ दिवसानंतर त्याचा मृतदेह समोर आल्यानंतर प्रकरण उघड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळमधील तापी नदीच्या परिसरात ही घटना उघड झाली आहे. मुकेश भालेराव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मुकेश भालेराव हा भुसावळमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर संशयित गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होते. 13 मार्च रोजी मुकेशची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. अमोलची हत्या झाली त्यानंतर त्याचा मृतदेह कुणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह हा तापी नदी जवळील निर्जनस्थळी जमिनीत पुरला होता. ७ दिवसानंतर जेव्हा मृतदेहातून दुर्दैंधी यायला लागली तेव्हा स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
          पोलिस घटस्थळावर गेल्यावर त्यांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा तो सराईत गुन्हेगार मुकेश भालेराव याचा असल्याचे समजले.
माझ्या मुलाची होळीच्या दिवशी हत्या झाली. पैशाच्या वादातून त्याची हत्या झाली आहे. लाखू लोखंडे आणि त्याच्या कुटुंबीयांनी, माझ्या मुलाचा साला, मावस भाऊ यांनी हत्या केली. १३ तारखेला होळीच्या दिवशी तो गायब झाला होता. आम्ही त्याच्या बायकोला विचारलं तर ते कुठं बाहेर गेले असतील असं सांगितलं. आम्ही घरी जाऊन विचारणा केली तर परदेशात गेला असं त्याची बायको सांगत होती. याआधीही लोखंडे परिवाराने त्याला मारहाण केली होती. ४ ते ५ दिवस हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं होतं. आता सकाळी आम्ही जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो, त्यावेळीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही, असं मृत अमोल भालेरावच्या कुटुंबीयांनी आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close