या कारणाने बस मधून पीडितेच्या आवाज बाहेर आला नाही

पुणे / नवप्रहार ब्युरो
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेने वासनांध दत्ता गाडे याचा प्रतिकार केला नसल्याच्या वानवा उठत होत्या. पण पोलिस तपासात पीडितेने विरोध केला परंतु तिचा आवाज बाहेर येऊ शकला नाही असे शास्त्रोक्त तपासात उघड झाले आहे.
स्वारगेट बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीला आरोपी दत्ता गाडे याने एका बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये नेऊन बलात्कार केला होता. ही बाब तरुणीने आपल्या मित्राला कॉल करून सांगितली. त्यानंतर तरुणाने पीडितेला पोलिस तक्रार करण्यास सांगितले. तक्रारीनंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर याप्रकरणात काही आगाऊ लोकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
पण पोलिसांनी दुसऱ्यांदा हा बसची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी केल्यावर पीडितेने आपल्या बचावासाठी आरडाओरड केली होती.पण शिवशाही बस वातानुकूलित असल्याने तिच्या काचा बंद असतात. आणि त्यामुळेच पीडितेचा आवाज बाहेर येऊ शकला नाही असे निष्पन्न झाले आहे.
दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याने स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला त्याच्याच गावातून पोलिसांनी अटक केली, सध्या तो कोठडीमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा पीडितेनं आरडा-ओरड केली, मात्र तिचा आवाज कसा ऐकू आला नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून ज्या बसमध्ये ही घटना घडली होती तिची शास्त्रोक्त तपासणी करण्यात आली आहे. ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची शास्त्रोक्त पडताळणी पोलिसांनी केली. यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अत्याचारावेळी तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. मोठ्याने आरडाओरडा करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या, त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही. असं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपीविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून या बसची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आहे.
दत्ता गाडे हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवाशी आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तो त्याच्या मुळगावी लपून बसल्याचा पोलिसांना सशंय होता. पोलिसांनी त्याला त्याच्याच गावातून अटक केली. पीडितेवर दोनदा अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून समोर आलं आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी कोठडीत आहे.