शिरजगाव कसबा येथे महाआरोग्य शिबिराच्या आयोजन
शेकडो लोकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ
प्रतिनिधी मुबीन शेख
शिरजगाव कसबा.
शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तारीख 17 रोजी आमदार बच्चू कडू यांनी थोर महापुरुष ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती औचित्य तसेच बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव कडू यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्य तालुक्यातील अनेक गावांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिरसगाव कसबा येथील महाआरोग्य शिबिरामध्ये नेत्र, हृदयरोग ,हाडाचे विकार, कॅन्सर ,पोटाचे विकार नाक कान घसा इतर जनरल तपासणी मार्गदर्शन तथा मोफत औषधी वाटप करण्यात आले या गावातील आयोजित आरोग्य शिबिराला आमदार बच्चू कडू यांनी स्वतः उपस्थित दर्शविली होती या गावातील आरोग्य शिबिराला परिसरातील सायखेडा रतनपुर ,मांगिया पुनर्वसन गाव, सर्पापूर, कल्लोडी व पांढरी या गावातील नागरिकांनी सुद्धा महाआरोग्य शिबिराला उपस्थित होते या शिबिराला गावातील संजय झिंगरे अक्षय गुर्जर राजेंद्र यावुल अविनाश बदुकले ओम कुऱ्हाडे रणजीत ठाकूर चंदन धाकडे बबलू आवारे सचिन दर्वे प्रसाद झिंगरे यश चौधरी अक्षय बदुकले या सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते.