कौटुंबिक न्यायालय, यवतमाळ येथे “सावित्रीबाई फुले जयंती ” निमीत्त पथनाटयाचे आयोजन
यवतमाळ / प्रतिनिधी
कौटुंबिक न्यायालय यवतमाळ, जिल्हा वकिल संघ यवतमाळ व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविदयालय यवतमाळ यांच्या संयुक्त विदयमाने आज दिनांक ०३/०१/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त *मला पण शिक्षण घ्यायचंय* या विषयावर सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटयाचे सादरीकरण केले. पथनाटयामध्ये आज समाज सुशिक्षित व प्रगतीशील आहे, परंतु लग्न झाल्यानंतर काही मुलीच्या शिक्षणाचा उपयोग केवळ घरापुरताच मर्यादित राहीलेला आहे. मुली शिक्षण तर घेत आहेत. परंतु, लग्न झाल्यानंतर त्यांच्या बुद्धीमत्तेवर किंवा त्यांच्या शिक्षणावर खूप मर्यादा येतात जेणेकरुन काही मुली लग्नानंतर आपल्या शिक्षणाचा स्वतःच्या व कुटुंबाच्या प्रगतीकरीता सासरच्या विरोधामुळे उपयोग करु शकत नाहीत किंवा नोकरी करु शकत नाहीत. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासामध्ये बाधा निर्माण होते हे विचार समाजपुढे आज मांडण्याची खरोखरच खूप गरज आहे अशी संकल्पना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष रं. काफरे यांनी आधोरेखित केली.
सदर पथनाट्य सादर करतेवेळी यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संजय जैन, सचिव अॅड, ठाकरे, अडें, मोहन गिरडकर, व जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड अमित बदनोरे आणि जिल्हा वकील संघाचे कार्यकारीणी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच वकील संघाचे सदस्य या वेळी उपस्थित होते आणि कल्पना सुभाष काफरे व खुशी सुभाष काफरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सदर पथनाटयामध्ये सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. अरुण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण कले. पथनाट्य सादरीकरण करणारया विद्यार्थ्यांचे कौटुंबिक न्यायालय व जिल्हा वकील संघाच्या वतीने प्रशस्तीपत्र देवून कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अडॅ. निलिमा जोशी यांनी केले.
तसेच या कार्यक्रमा प्रसंगी कौटूंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती माटे, प्रभारी प्रबंधक नरेश दहातोंडे, सहा. अधिक्षक अरुण गट्टावार, वरीष्ठ लघुलेखक श्री. प्रमोद फाळके, वरीष्ठ लिपीक मनिष गंपावार, कनिष्ठ लिपीक निसार शेख, अमोल ठाकरे, उत्त्कर्षा कनवाळे, आनिता सोनटक्के, एकनाथ बाहेकर, पांडुरंग वाघमारे तसेच न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस शिपाई निकेश राठोड, निशा शेंडे आणि पक्षकार इत्यादी मोठ्या संख्याने उपस्थित होते.