सामाजिक

दत्त जयंती निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्रात महाप्रसाद, भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित,

Spread the love

 

नेर:- नवनाथ दरोई

नेर शहरातील मधोमध असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती निमित्ताने सात दिवस ग्रामदेवता सन्मान, मंडळ मांडणी, होम हवन, स्वामी समर्थांचे पूजन व आरती करण्यात आल दैनंदिनी आरतीला दोन्ही वेळेस महिला मोठ्या संख्येने दिसून येत होत्या. समाप्तीच्या दिवशी स्वामी समर्थांच्या समोर पंचपक्कवांचा व पेढयाचा नैवेद्य ठेवण्यात आला. आरती नंतर तिथे उपस्थित असलेल्या भाविकांना वाटण्यात आला. नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महाप्रसाद घेण्यासाठी नेर शहरातील जनसागर उसळला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी करता स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close