सामाजिक

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 भूतलावर अनेक जीव।आहेत त्यापैकी काही हिंस्रक , काही पाळीव ,काही जलचर ,काही सरपटणारे असतात. यात साप हा देखील एक आहे. सहसा जो पर्यंत आपण सापाच्या वाट्याला जात नाही तो पर्यंत तो आपल्यावर हमला करत नाही. मग तो किंग कोब्रा का असेना. पण त्याच्या वाट्याला गेलो तर मग तो आपली काय गत करू शकतो हे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून समोर येत आहे.

कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र तरीही काही लोक न घाबरता या सापाला अगदी सहज पकडतात किंवा त्याच्यासोबत खेळताना दिसतात. एका व्यक्तीने असंच काहीसं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लगेचच आपल्या कर्माचं फळ मिळालं.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

 

 

कच्च्या वाटेवर कोब्रा साप फणा पसरवत उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या समोर दोन तरुण गाडीतून उतरत उभे आहेत.

त्यापैकी एकाच्या हातात रायफल आहे. त्या शस्त्राच्या साहाय्याने तो दोनदा सापावर गोळीबार करतो पण सापाला गोळी लागत नाही. यामुळे संतापलेल्या कोब्राने दोन्ही तरुणांवर झटपट हल्ला केला, त्यानंतर दोन्ही तरुण घाबरून ओरडताना दिसतात. इथेच हा व्हिडिओ संपतो.

हा व्हिडिओ एकूण 10 सेकंदांचा आहे. Instant Karma नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे ते समजू शकलं नाही, पण तो १६ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. यात दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- कोब्रासोबत लढताना बंदुकीचा काही उपयोग नाही!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close