
बॉयफ्रेंडला भेटता यावे म्हणून ती गावातील लाईन करायची बंद
बेतीया ( बिहार ) / नवप्रहार वृत्तसेवा
देशात लैला – मजनू ,हिर -रांझा ,सोहनी – महिवाल असे प्रेमात अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. यापैकी सगळेच आपल्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांना एकमेकांशिवाय शिवाय दुसरे काही दिसत नव्हते. या जोड्या प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असत. हे झालं पूर्वीच्या काळात.पण या युगात देखील प्रेमाचे अनेक किस्से पाहायला मिळतात. असाच एक किस्सा बिहार च्या बेतीया येथे घडला आहे. येथे एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटता यावे यासाठी अख्ख्या गावाला अंधारात ठेवत होती.
बिहारमध्ये अलीकडच्या काळात अनेक प्रेमप्रकरणं उघडकीस आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एक तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला भेटली. प्रेमात आकंठ बुडाली. दोघेही पसार झाले. तरुणाच्या खिशात काही पैसे होते. ते संपल्यानंतर दोघांमध्येही ब्रेकअप झाला. खगडियामध्ये दोन मुलांची आई तीन मुलांच्या बापासोबत पळून गेली. त्यानंतर महिलेच्या पतीने त्या व्यक्तीच्या पत्नीसोबत लग्न केलं होतं.
तिचा बॉयफ्रेंड भेटण्यासाठी गावात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर एका बागेत नेऊन धुतले. बॉयफ्रेंडला मारहाण होत असल्याचे पाहून ती तरूणी सर्व गावकऱ्यांसोबत भिडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी गावकऱ्यांशी ‘पंगा’ घेताना तरूणी या व्हिडिओत दिसते.बेतियामध्येही एक प्रेम प्रकरणं आली आहे. नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तरुणीचा प्रेमप्रताप उघड झाला आहे. बॉयफ्रेंडला भेटता यावं म्हणून ती संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करायची. १४ जुलैलाही तिचा बॉयफ्रेंड भेटायला आला होता. त्यावेळीही तिने अख्ख्या गावची वीज कापली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही तरूणी संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित करायची. अंधारात तिचा बॉयफ्रेंड भेटण्यासाठी जायचा. दुसरीकडे वीज गुल झाल्यानंतर गावात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. गावातल्या अनेकांच्या मोटरसायकल, धान्य, अन्य वस्तू चोरीला जायच्या. त्यामुळे त्रासलेले गावकरी जागता पहारा द्यायचे. पहारा देत असतानाच या दोघांना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तर त्या तरुणाला मारहाण केली.गावात काळोख पसरायचा, चोरीच्या घटनाही वाढल्या
मारहाणीचा बदला घेण्यासाठी आपल्या काही मित्रांना घेऊन गावात गेला. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या तरुणासोबत तिघा तरुणांना ताब्यात घेतले. तसेच तरूण आणि तरुणीकडील नातेवाइक पोलीस ठाण्यात पोहोचले. दोघांचेही लग्न लावून देण्याची दोन्ही पक्षकारांनी तयारी दर्शवली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडचीही सुटका केली.