क्राइम

सिंदी रेल्वे येथून शेळ्यांची चोरी आणि मध्यप्रदेशात विक्री 

Spread the love

सत्य कथन की बनाव

वर्धा  / नवप्रहार मीडिया 

                  शेतातील शेळ्या चोरण्यासोबतच सालगड्यांना चोरून नेण्याचा  अजब प्रकार सिंदी रेल्वे येथे उघडकीस आला आहे. चोरीला गेलेल्या शेळ्या मध्यप्रदेश राज्याच्या बैतुल जिल्ह्यात विकल्या गेल्याचे सालगड्याचे म्हणणे आहे. या लोकांनी त्यांच्या सोबत घटनेबाबत त्यांनी जो घटनाक्रम कथन केला आहे तो संशयास्पद आहे.

           परसोडी शिवारात जुगल अवचट यांचे शेत आहे. त्यांनी शेती सोबत जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला. देखभालीसाठी सालकरी म्हणून विठ्ठल परसके राळेगाव तसेच रामा बोरीकर यांना कामावर ठेवले. अवचट हे शेतात गेल्यावर त्यांना धक्काच बसला. मोठ्या प्रमाणात शेळ्या गायब झाल्या होत्या. तसेच दोन्ही सालकरी आढळून आले नाही. त्यांनी तडक पोलीस ठाणे गाठले. तपास सूरू झाला असतांनाच दोन्ही सालकरी दरम्यान गावात परतले. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री काही अज्ञात इसमांनी गोठ्याचा दरवाजा तोडला. त्यानंतर सालकरी परचाके व बोरीकर यांना मारहाण केली. चाकूच्या धाकावर दोघांचे अपहरण केले. शेळ्या नेत या दोघांच्या डोळ्यास पट्टी बांधून सोबत घेऊन गेले. चोरी केलेल्या शेळ्यांची मध्यप्रदेशात विक्री केली.

विक्रीतून आलेली काही रक्कम या दोघांच्या हातात दिली.एवढेच नव्हे तर हे दोघे रक्कम स्वीकारत असल्याचा व्हिडीओही शूट केला. नंतर पैसे हिसकून घेत दोन हजार रुपये त्यांच्या हाती देत पळून जाण्याचा सल्ला दिला.मालकास किंवा पोलीसांना या घटनेची माहिती दिली तर ठार मारण्याची धमकी पण दिली. या दोघांना नंतर बैतुल शहरालगत सोडून देत भामट्यानी पोबारा केला.

शेवटी या सालकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत कसेबसे नागपूर गाठले. एकदाचे शेवटी ते गावी सिंदीत पोहचले. या प्रकरणी सात लोकांना ताब्यात घेवून कसून चौकशी सुरू केली.

घटनाक्रम संशयास्पद – सालकऱ्यांनी सांगितलेला घटनाक्रम संशयास्पद आहे. कारण चोर जरी एकापेक्षा जास्त असले तरी ते दोघे होते. चोर अचानक आले तरी हे दोघे आरडाओरडा करू शकले असते.पण यांनी चोरांसमोर शरणागती पत्करली.सोबतच हे दोघे सांगतात की त्यांनी यांच्या हातात काही पैशे देऊन गप्प राहण्यास सांगितले . असे झाले असले तरी यांनी बैतुल येथूनच मालकाला या घटनेची माहिती देणे अपेक्षित होते. पण यांनी सिंदी येऊन मालकाला घटनाक्रम सांगितला हे संशयास्पद आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close