नगर परिषद शाळा क्रं १ मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मोफत सायकल चे वाटप

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार.
घाटंजी नगर परिषद शाळा क्रं १ मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्य मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग ८ वी च्या मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ फुसे होते.समता सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये चित्रकला,रांगोळी, निबंध,गायन स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविकमुख्याध्यापक आशिष साखरकर यांणी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व शाळेत घेत असलेले उपक्रमावर त्यांणी उपस्थितांणा माहिती दीली. या कार्यक्रमाचे संचालन विपुल भोयर यांनी केले आभार प्रदर्शन सरिता पडोळे यांनी केले.या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी विपुल भोयर, सविता देठे,सरिता पडोळे,सोनिया पांडे,वंदना दीडशे, भारत नगलाले यांनी परिश्रम घेतले.