आज भंडारा येथे ५ व्या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याचे आयोजन
प्रवीण भोंदे
प्रतिनिधी
भंडारा : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद भंडाराच्या वतीने रविवार दिनांक ८ जून २०२५ ला सकाळी ९.३० ते ५ वाजता ५ व्या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याचे आयोजन समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन सभागृह भंडारा येथे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष हौशिला प्रसाद दुबे राहणार आहेत. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक नरूल हसन, उपवनसंरक्षक अधिकारी राहुल गवई, कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. सुधाकर झलके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या चर्चासत्र व मार्गदर्शन दुसरे सत्र दुपारी १ वाजेपासून ते ५ वाजेपर्यत चालणार आहे. त्यावेळी केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी मार्गदर्शन, राज्य कार्यकारणीचे मनोगत, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र महासचिव प्रा. पुरण लोणारे, सचिव डॉ. देवेंद्र सोनटक्के, दिपक चिमणकर, श्रीराम गणेर, प्रा. प्रणशील खांडेकर, करण बोरकर, आकाश मेश्राम, प्रा. सुनिल उके, मनोज खोब्रागडे, प्रा. आशिष बोरकर, श्याम भालेराव, प्रफुल्ल आपटे, प्रा. राजकुमार उके, राज रहांगडाले, महिला विभाग सुनंदा भगत, अश्विनी भिवगडे, प्रवित्रा भोवते, मंजू गजभिये व पूर्व विदर्भ मानवाधिकार कार्यकारणी जिल्हा भंडारा शाखेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.