उफफफफफ……आता तर हद्दच झाली !

बस कंडक्टरने चालत्या गाडीत तरुणी सोबत ठेवले लैंगिक संबंध
हाथरस (युपी ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क
उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यात कधी काय होईल याचा नेम नसतो. उत्तर प्रदेश च्या हाथरस मधून एक लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. बस कंडक्टर ने चालत्या बस मध्ये मागील बाकावर प्रवाशी तरुणी सोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटने नंतर समाज कुठल्या स्तराला जाऊन टेकला आहे हे समोर येत आहे.
बसमधील एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये शूट केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने संबंधित कंडक्टरचा आणि चालकाचा करार रद्द केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, हाथरस डेपोची बस लखनऊच्या दिशेनं जात होती. यावेळी धावत्या बसमध्ये कंडक्टर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये, कंडक्टर बसच्या मागील सीटवर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. दोघंही अंगावर ब्लँकेट पांघरून हे गैरवर्तन करत आहेत.
हे गैरवर्तन अनेक प्रवाशांच्या लक्षात आलं. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी अर्धनग्न अवस्थेत असणाऱ्या कंडक्टरने व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाबरोबर हुज्जत घातली. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचं बोललं जात आहे.
ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापकाने (एआरएम) त्वरीत कारवाई केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द केला आहे. हाथरस डेपोच्या एआरएम शशीराणी यांनी या व्हिडीओची पुष्टी केली आहे. ही घटना अंदाजे दहा दिवस आधी घडल्याचंही त्यांनी सांगितलं. एका प्रवाशाच्या तक्रारीनंतर परिवहन अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरचे करार तातडीने रद्द केले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.