राजकिय

प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट ; पवार आणि राजनाथसिंग यांच्यात चर्चा

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया

काल दि. 7 मे ला देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गौप्यस्फोट करत राजनाथसिंग आणि शरद पवार यांच्यात चचा झाली असून नखे ती काय झाली हे सांगावे अशी मागणी  केली आहे.

आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का? असा सवाल करतानाच राजनाथ सिंह यांच्याशी काय चर्चा झाली? ही चर्चा शरद पवार यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांच्या या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता. राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तब्येत बिघडल्यावर कोणी फोन करत नाही

ऐन निवडणुकीत कोणाची तब्येत बिघडली तरी कॉल करत नाही. पण शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना कॉल का केला? याचा खुलासा करावा. ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला? याचा खुलासा केला पाहिजे. उत्तरं देताना कोणतीही बालबोध उत्तर देऊ नका, खरं कारण काय हे त्यानी सांगावं. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या. कॉल केला की नाही त्यांनी सांगावं. पुढे आम्ही काय ते बोलू, असं आंबेडकर म्हणाले. निवडणुकीत असे फोन केले जात नाही. त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यामुळे शरद पवार यांनी खुलासा करावा. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मदत करण्यासाठी फोन केला का?, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंसाठी काम केलं

आम्ही बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close