सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या जिल्हाध्यक्षपदी बंडु आठवले

Spread the love

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
ड्रा बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर धम्म अभियान कार्य करीत असून अभियाना मार्फत अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येत असतात. त्यामध्ये धार्मिक शिबीरे आयोजित करणे.
धम्म सहली आयोजित करणे, दीक्षाभूमी मध्ये येणाऱ्या नागरिकांन साठी भोजन दान आयोजित करणे, भीमा कोरेगाव मानवंदना, घरा घरात बौद्ध वंदना संस्कर, वर्षावास निमित्त दरवर्षी अधिष्ठान स्पर्धा, असे विविध धार्मिक कार्यक्रम अभियाना मार्फत राबविले जातात.
त्यासाठीया वर्षीचा लेखाझोका मांडण्या साठी शासकीय रेस्ट हाऊस यवतमाळ येथे महाराष्ट्रातील प्रतिनिधीची मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये अभियानाची अमरावती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ही बंडूभाऊ आठवले “माजी नगर सेवक” चांदुर रेल्वे यांना सोपविण्यात आली आहे.बंडु आठवले हे अमरावती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून सुद्धा निवडून आले होते. बहुजन पत्रकार संघटनेचे सुद्धा जिल्हा अध्यक्ष पद त्यांच्या कडे होते. अनेक दिवसापासून फुले शाहू आंबेडकर विचार मंचामध्ये काम करत असून जिल्ह्यामध्ये त्यांचा दांडगा परिचय आहे. दरवर्षी धम्म सहलीचे आयोजन करून अगदी कमी पैशांमध्ये गोरगरीब जनतेला बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, या ठिकाणचा प्रवास करून आणित असतात. सोबतच नितीनजी टाले सर धम्म सेवक यांना अमरावती जिल्हा संघटक प्रमुख म्हणून व धामणगाव (रेल्वे) तालुका प्रमुख (ग्रामीण शहर ) म्हणून जवाबदारी सोविण्यात आली आहे. तसेच भूषण मोरे सर, शिल्पकार पेपरचे मुख्य संपादक, यांना परभणी,हिंगोली जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
तसेच मृदुलता हिरोंडे अमरावती जिल्हा उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
करीता सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या धम्मकार्याला अभियानाच्या वतीने मंगलमय हार्दिक सुभेच्छा.व मनपुर्वक अभिनंदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान सेन्ट्रल कमिटी प्रमुख जगदीश शिंदे, महिला संघटिका पपिता मनोहरे ,इंदुबाई नारनवरे,रवींद्र कांबळे करुणा मून, विनोद कांबळे,पदमाकर वाहिले सुनील शिंदे,मनोज गवई, अरुणा आठवले,नितीन टाले, अंकुश वाकडे, रमा बनसोड, संध्या बारसे, सौ सावते, जगदेव इंगोले, रमेश गडलिंग, प्रकाश नाईक, सोपान कांबळे, रमा बोंमले,गजानन गवई, सरला ससाणे, निर्मला गडलिंग मीटिंगला उपस्तित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close