राजकिय

आगामी मनपा निवडणुकीत ६० सिटा मिळवण्याचा विश्वास – प्रविण पोटे पाटील

Spread the love

शहरातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अमरावती भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

भाजपा अमरावती शहर अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांचे उत्कृष्ट संघटन

अमरावती / प्रजिनिधी

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले महायुती सरकारच्या योजना, सरकार ने केलेली विकास कामे यांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आपले लाडके देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झालेत. तसेच विधानसभेत अमरावती व बडनेरा सह जिल्हयातील आठ पैकी सात जागेवर भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या अहोरात्र मेहनतीमुळे महायुतीचे सात उमेदवार निवडून आले असून यातील पाच जागा भाजपा व दोन मित्रपक्षांच्या आहेत. अमरावतीमध्ये भाजपा च्या वतीने असंख्य विकास कामे झालीत नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जनतेच्या समस्या जाणून त्याचे निराकरण केले, सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्यात, शहराच्या विकासाकरिता भाजपाच जनतेला पाहिजे असून आगामी मनपा निवडणुकीत ६० सिटा मिळवण्याचा विश्वास भाजप नेते प्रविण पोटे पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष यांचे विधानसभा निवडणुकीतील उत्कृष्ट संघटन तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मेहनतिच्या जोरावर भाजपा ने मोठे यश संपादन केले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विकासात्मक दृष्टिकोन पाहता आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर मध्ये भाजपा शहर अध्यक्ष मा. आ. प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर रीत्या प्रवेश केला यात शिवसेना उबाठा च्या स्वातीताई निस्ताने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरावतीचे माजी महापौर श्री प्रविणजी काशीकर सह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मा. देवेन्द्रजी फडणवीस पहिल्यांदाच अमरावती मध्ये येत असून त्यांच्या स्वागताच्या जय्यत तयारी बद्दल चर्चा करण्यात आले तसेच भाजपा सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत जास्तीत जास्त सदस्य जुळवण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जयंतजी डेहनकर, शिवरायजी कुळकर्णी, निवेदिताताई दीघडे, चेतनजी पवार, विवेक कलोती, अनिताताई राज, कौशिक अग्रवाल, गंगाताई खारकर, लखन राज सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close