Uncategorized

जि.प.प्रा.शाळा, कार्ला फाटा येथे सुविधांचा अभाव

Spread the love

जि.प.प्रा.शाळा, कार्ला फाटा येथे सुविधांचा अभाव
(अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना एकाच ठिकाणी सुरू)

बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यातील कार्ला फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये गैरसोयी अभावी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोखा निर्माण झाला असून या गंभीर बाबीकडे शिक्षण विभाग व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे प्राथमिक शाळेसह पशुवैद्यकीय दवाखाना व अंगणवाडी एकाच ठिकाणी आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मौ. कार्ला फाटा येथे पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे लहान लहान बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड गैरसोय होत असून या ठिकाणी एकाच जागी अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पशुवैद्यकीय दवाखाना आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी व पहिली ते चौथी पर्यंतची शाळा असल्यामुळे १० वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. या शाळेतील पटांगणांतील सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
पावसाळ्यात पटांगनात पाणी व चिखल साचल्यामुळे विद्यार्थ्यांचे खेळणे बंद झाले असून अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यातून व गवतातून शाळेत जावं लागते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्याचबरोबर पटांगणात पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्याही पलीकडे जाऊन जर पाऊस संततदार असेल तर पटांगणात २ ते ३ फूट पाणी साचते त्यामुळे शाळेला पूर्णतः सुट्टीच द्यावी लागते. विद्यार्थ्यांच्या या गंभीर बाबीवर शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत प्रकर्षाने लक्ष द्यावे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close