राज्य/देश
चंदिगढ / नवप्रहार ब्युरी
राज्यात बदलापूर बनावटी एन्काऊंटर आणि परभणी येथे पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच चंदिगढ मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे सीबीआय कोर्टाने पोलीस महानिरीक्षक आणि आठ पोलिसांना कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हे प्रकरण 2017 मधील आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी बलात्कार व खूनप्रकरणी सात जणांना अटक केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन आयजी जहूर जैदी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती.
ता. 18 जुलै 2017 रोजी कोटखाई पोलिस ठाण्यात आरोपी सूरजची चौकशी सुरू असताना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली. मात्र, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने फोनवरून डीएसपी मनोज जोशी यांना फोनवरून सर्व घटनाक्रम सांगितला. हा संवादच पुढे शिक्षेसाठी महत्वाचा पुरावा ठरला. या प्रकरणानंतर मोठा वाद झाला आणि नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सीबीआयने गुन्हा नोंद करत जैदी यांच्यासह इतर आरोपींना अटक केली. नंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, आरोपींनी या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण चंदीगडमधील विशेष सीबीआय कोर्टात वर्ग करण्यात आले. या कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणीही एका आरोपीला शिक्षा झाली आहे.
कोण आहेत शिक्षा झालेले पोलिस?
तत्कालीन आयजी जहूर जैदी, डीएसपी मनोज जोशी यांच्यासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक राजिंदर सिंह, सहायक पोलिस निरीक्षक दीप चंद शर्मा, हेड कॉन्स्टेबल मोहन लाल, सूरत सिंह, रफी मोहम्मद, रानित सटेटा यांचा समावेश आहे. सूरज यांचा कोठडीत खून झाल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना दोषी धरले होते.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |