शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण ; व्हिडिओ व्हायरल ,अनेकांकडून कृत्याचा विरोध

पूर्वी ‘ छडी लागे छमछम ,विद्या येई घमघम ‘ असे म्हटले जायचे. अर्थात शिक्षक जे विद्यार्थी अभ्यास करत नव्हते त्यांना छडीने मारायचे. पण त्यातही काळजी बाळगणे हा महत्त्वाचा भाग होता. पूर्वीचे शिक्षक शिक्षा करतांना छडीने हातावर किंवा पृष्ठभागावर मारायचे. पण आता तर मुलांना एखाद्या शिक्षिकेकडून अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ मधामधातून व्हायरल होत असतो. बरे आता कायदे देखील पूर्वीपेक्षा कडल झाले आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षक्कांवर तक्रारी नंतर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते . तरी सुद्धा काही शिक्षकांकडून असले कृत्य होत असते.
विद्यामंदिरात शिस्तीचं पालन करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. खरंतर शिस्तीचा नियम हा साधारणपणे विद्यार्थ्यांना समजवावं लागतो पण काही वेळा शिक्षक सुद्धा इतके बेताल वागतात की त्यामुळे नक्की कोणाला शिक्षणाची गरज आहे असा प्रश्नच समोर येतो. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शननुसार यामध्ये एक शिक्षिका आपल्याला विद्यार्थिनीला चक्क बेल्टने मारताना दिसत आहे.
सदर व्हिडीओ @CCTV_IDIOTS या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये एक विद्यार्थिनी बाकावर बसलेली दिसतेय तर एक शिक्षिका बाजूला उभी आहे. सुरुवातीला ती विद्यार्थिनीकडे बघते आणि मग तिच्या हातातल्या बेल्टने ती चक्क समोरील विद्यार्थिनीच्या तोंडावर मारायला सुरुवात करते. विद्यार्थिनी शिक्षिकेला थांबवण्याचा प्रयत्न करताना शिक्षिका चक्क केस धरून विद्यार्थिनीला खेचू लागते. हे सगळं घडत असताना कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसतेय.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याला आतापर्यंत २ लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वच नेटकऱ्यांनी या शिक्षिकेच्या अमानुष वागणुकीवर टीका केली आहे. इतर विद्यार्थ्यांनी कोणीच मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला का नाही असाही प्रश्न यावर केला जात आहे. काहींनी तर हा प्रकार तुमच्या मुलाबरोबर झाला असता तर काय केलं असतं असाही प्रश्न केला आहे. ही शिक्षिका अत्यंत अहंकारी दिसतेय असेही काहींनी लिहिले आहे.

