राजकिय

अभद्र युती चा बोलबाला ; धानोरकर गटाचा मुह काला

Spread the love

चंद्रपूर / विशेष प्रतिनिधी

            कॉंग्रेस आणि भाजपा युतिला अभद्र युती म्हणून हिनवणाऱ्या धानोरकर गटाला धूळ चारत 18 पैकी 12 जागा जिंकून चंद्रपूर बाजार समितीची  सत्ता काबीज  करणाऱ्या प्रकाश देवतळे आणि देवराव भोंगळे यांनी ढोलताशाच्या तालावर ठेका धरत विजयोत्सव साजरा केला आहे. अर्थातच हे मुनगंटीवार आणि वडेट्टीवार यांच्या छुप्या समर्थनामुळे शक्य नव्हते हे काही वेगळे सांगायची आवश्यकता नाही. यानंतर मात्र राजकारणात काहीही अशक्य नाही याची चर्चा रंगू लागली आहे.

खासदार धानोरकर समर्थित चोखारे गटाचा भाजप काँग्रेस अभद्र युतीने पराभव करताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. मात्र, हा विजयोत्सव साजरा करता आपण काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याचे विसरून गेले.काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राजकीय विरोधक आहेत. मात्र, चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीत ही ओळख पुसली गेली. खासदार धानोरकर गटाच्या दिनेश चोखारे यांचा पराभव होताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यकत्र्यांसह एकत्र येत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.

त्यामुळे एकमेकांसाठी वैरी असलेले दोघेही आत सख्ये झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष नाचण्यात इतके धुंद झाले होते की त्यांना आपण एका जबाबदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याचे विसर पडले होते. त्यामुळे राजकारणका काहीही होवू शकते याची नागरिकांनी कल्पना आली आहे.विशेष म्हणजे राजुरा बाजार समितीच्या निवडणुकीत देखील काँग्रेसने भाजप सोबत युती केली.

भाजप व काँग्रेस ची ही राजकीय युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांच्यासाठी धोकादायक ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close