प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र द्यावे सिनेट अधीसभेत डॉ. नितीन टाले यांची मागणी
विद्यार्थी सुविधा केंद्राचा विद्यापीठाचा निर्णय

अमरावती प्रतिनिधी /
अमरावती-
यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र द्यावे अशी मागणी सदस्य डॉ.नितीन टाले यांनी सिनेटच्या पहिल्या आधीसभेत केली.
या चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठा संबंधी कामकाजाकरिता अमरावतीला यावे लागते. विद्यार्थ्यांकरता या देशात रस्ता होते. गरीब विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात यात वेळ व पैसा खर्च होतो . विद्यापीठाचा व्याप पाहता विद्यार्थ्यांना वेळेवर सेवा उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांचा हा त्रास वाचावा याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपकेंद्र द्यावे अशी मागणी सिनेट आधीसभेमध्ये करण्यात आली.
यावर उत्तर देताना कुलगुरू डॉ. प्रदीप येवले यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येईल. एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती तेथे करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता जास्तीत जास्त कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा सभागृहात केली.
विद्यार्थी सुविधा केंद्रमुळे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल. अनेक वर्षापासून ही मागणी या चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.