हटके

मगरीच्या त्या कृत्याची सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा

Spread the love

               सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत प्राण्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होता असतात. त्यात कधी जंगली प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना दाखवतात. तर काही वेळा या हिंस्त्र प्राण्यांच्या चक्रव्यूहातून काही प्राणी आपले स्वरक्षण करण्यात यशस्वी होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..यात एक मगर मादा हरिणाला आपल्या जबड्यात पकडते. पण काही वेळाने ती तिला सोडून देते. या व्हिडिओ  काही तासातच लाखो ह्यूज मिळाले आहेत.

प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित हे व्हिडिओज पाहायला लोकांना फार आवडते. लोक मजा घेत घेत असे व्हिडिओ पाहतात आणि याच कारणामुळे ते सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मगरीच्या हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मगर हा पाण्याचा सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. एकदा का शिकार त्याच्या रडारखाली आला की पळून जाणे अवघड होऊन बसते पण तुम्ही कधी अशी मगर पाहिली आहे का जी शिकार पकडल्यानंतर त्याला जिवंत सोडते? अजिबात नाही तर याच्याशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये मगरीने हरणाला शिकारीसाठी पकडले मात्र काही वेळाने त्याने असा धक्कादायक प्रकार केला की ते पाहून सगळेच अवाक् झाले.

काय घडले?

वन्य प्राण्याशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यावर भक्षक मगर भक्ष्याच्या शोधात तिथे फिरत असल्याचे दिसून येते. तेव्हा त्याची नजर हरिणावर पडली आणि मगरीने तिची शिकार करण्यासाठी सापळा रचला. काही वेळातच मगर हरणाजवळ आली आणि त्याने त्याला जबड्यात पकडले. पाण्याचा राक्षस मगर हरणाला चावत मारणार होता, तेवढ्यात मगर अचानक हरणाला आपल्या जबड्यातून मुक्त करते आणि हरीण पळून निघून जाते. खरं तर, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की, मगरीने हरणाला पकडताच ती गर्भवती असल्याचे समजले. अशा स्थितीत त्याने हरणाला काही सेकंद जबड्यात धरून मग मुक्त केले. व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतं की, नवीन जीवन मिळताच हरण ताबडतोब जंगलाच्या दिशेने धावते.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @ajaychauhan41 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अप्रतिम निसर्ग, हरीण गरोदर असल्याचे मगरीला समजताच मगरीने लगेच हरण सोडले. लक्षात ठेवा…वन्य प्राणी कधीच कुणाला मारत नाहीत आणि चवीसाठी खात नाहीत, ते भूक भागवण्यासाठी खातात. निसर्गाच्या या नियमाला फक्त एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे माणूस.”

व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानवाला जर बाजूला ठेवले तर कदाचित या विश्वातील कोणत्याही सजीवाने आपला स्वभाव बदललेला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटते की मगर स्वतः गर्भवती आहे. तिने फक्त सहानुभूती दाखवली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close