खेळ व क्रीडा

T-20 वर्ल्ड कप मध्ये मोठा उलटफेर ; अफगाणिस्तानने चारली अस्ट्रेलिया ला धूळ

Spread the love
बार्बाडोस  / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क
टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात मोठी उलथापालथ यावेळी झाल्याचं दिसून आलं. अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ६ बाद १४८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाचा डाव १२७ धावात गुंडाळला. गुलबदीन नैबने चार गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. त्याने मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड आणि पॅट कमिन्स या चौघांना बाद केलं.

अफगाणिस्तानने दिलेल्या अवघ्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला. गुलबदीन नैबच्या गोलंदाजीसमोर कांगारुंनी नांगी टाकली. टी२० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अफगाणिस्तानने धक्कादायक विजयाची नोंद केली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केली. रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झारदान यांनी अर्धशतके केली. गुरबाजने ६० तर झारदाने ५१ धावा केल्या. दोघांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने सुरुवातीलाच धक्के दिले. त्यानंतर राशिद खानने गुलबदीनच्या हाती चेंडू सोपवला आणि सामन्याचं चित्रच बदललं. गुलबदीनने ४ षटकात २० धावा देत चौघांना बाद केलं. यात चारही दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना त्याने तंबूत धाडलं. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्यांचा डाव १२७ धावात संपुष्टात आला आणि अफगाणिस्तानने २१ धावांनी विजय मिळवला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close