बापरे … ! भयंकर …..! आई तिचा प्रियकर आणि मावशी कडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

मुंबई / नवप्रहार मीडिया
आईसाठी मुलं काय असतात हे तिचे तिलाच माहीत. आई ही मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. मुलाला थोडं जरी खरचटलं तर ती कासावीस होते. साधा ताप जरी आला तर ती रात्र रात्र जागून काढते. पण एका आईने निर्दयतेची हद्द पार केली आहे.तिने प्रियकरा कडून आपल्या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. मुलाच्या मावशीने सुद्धा त्याचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक आणि क्लेशदायक प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे मुलगा ९ वर्षाचा असतांना त्याचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे.
मुलाच्या वडिलांच्या हातात त्याची डायरी लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, लग्नाच्या १ वर्षानंतर आम्हाला मुलगा झाला. मुलगा आता १४ वर्षाचा आहे. माझी पत्नी माझ्यापासून वेगळी राहते. ती रागाच्या भरात मुंबई सोडून तिच्या वडिलांच्या गावी राहायला गेली. माझ्या मुलाची तब्येत खराब असल्याचे मला कळाले. तेव्हा मी तिथे गेलो आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले.
मुलगा आजारी कसा पडला याचे कारण जाणून घेण्यासाठी मी मुलाला विश्वासात घेतले. परंतु आईच्या अत्याचाराने भयभीत असलेल्या मुलाने काहीच सांगितले नाही. परंतु मला मुलाकडची डायरी सापडली. ज्यात मुलाने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं होते. ही डायरी वाचून मला धक्का बसला. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलाने डायरीत लिहिलं होतं की, जेव्हा मी चौथीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या आईचे एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दोघे नेहमी एकमेकांसोबत संबंध ठेवायचे. त्यावेळी आई आणि त्या व्यक्तीने जबरदस्ती माझेही शोषण केले. इतकेच नाही तर जेव्हा आईची बहीण तिला संधी मिळायची तेव्हा तीदेखील माझे लैंगिक शोषण करत होती.
मी या गोष्टीचा विरोध करायचो तेव्हा मला चटके दिले जायचे. पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा १३ वर्षाचा आहे. परंतु जेव्हा त्याचे लैंगिक शोषण झाले तेव्हा तो ९ वर्षाचा होता. पोलिसांनी तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी आईला अटक केली आहे. प्रियकर आणि बहिणीचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्या दोघांनाही अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपी आईला अटकही केली आहे. तर तिचा प्रियकर आणि बहिणीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई उपनगरात ही घटना घडली.