चांदूर बाजार येथील दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या ताब्यात
प्रतिनिधी मुबीन शेख. चांदूरबाजार
अमरावती ग्रामिण जिल्हयातील घडत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा आढावा घेवुन सदर चोरीच्या घटनांवर त्वरीत आळा बसविण्या करिता तसेच घडलेल्या चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अधिनस्थ सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना सुचना निगमीत केल्या होत्या.
दि. ०२/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचे पथक आरोपी शोध करिता पेट्रोलिंग करीत
असतांना असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, सदर प्रकारच्या दुचाकी चोरीच्या घटना हया विनय शैलेश
मेश्राम, वय २६, रा. पिपळपुरा, चांदुर बाजार हा करित असुन सद्यस्थित आरोपी हा गुन्हा करण्याचे तयारीने
पोलीस स्टेशन चांदुर बाजार हद्दीत फिरत आहे. प्राप्त माहीतीची शहानिशा करून पथकाने आरोपी येत असलेल्या बहीरम
रोडवर सापळा रचुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
सदर आरोपीस मोटार सायकल चोरीचे गुन्हयाबाबत अधिक विचारपुस केली असता सरूवातीस त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली, परंतु पोलीसांपुढे जास्त काळ टिकाव न लागल्याने आरोपीतांने त्याने पोलीस स्टेशन चांदुर बाजार हद्दीत दुचाकी चोरीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या गुन्हयातील चोरी गेलेली पल्सर दुचाकी किं. अं.४०,०००/- रूची जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन चांदूरबाजार यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करित आहे.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. शशिकांत सातव, अपर
पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. यांचे मार्गदर्शनात तपन कोल्हे, पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण.
यांचे नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अमलदार संतोष मुंदाने. बळवंत दाभणे, पंकज फाटे, हर्षद
घुसे यांचे पथकाने केली.