सामाजिक

खापरी येथिल पुरग्रस्तांचा तहसीलला संतप्त मोर्चा.

Spread the love

काही पुरग्रस्तांना देण्यात आलेली मदत ही तोंडपाहू धोरण.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यात २२/७/२३ रोजी पखवसाने पार झोडपुन काढले या अतिवृष्टीच्या पुराचा तडाखा वाघाडी नदीकाठच्या खापरी गावालाही बसला.गावात नदीकाठच्या घरात पाणी शिरलेमूळे घरांचे पडझड झाली सोबतच बरेच सामान वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले.शासनाकडून पंचनामे झाले व नुकसानग्रस्त भागाची यादी १३० कुटूंब प्रमाणे झाली यात काही अती तर काही अंशता प्रमाणात त्यापैकी काही कुटूंबाला किट साहीत्य व चेक स्वरुपात शासन मदत देण्यात आली पण, ही मदत तलाठी व ग्रामपंचायत यांच्या दूर्लक्षित धोरणामूळे तसेच काहींना गावनमूना ८ मूळे तोंडपाहून व राजकीय हेतू पुरसर देण्यात आली असल्याचा आरोप करत खापरी येथिल संतप्त पुरग्रस्त महीला व पुरुषांनी करत तहसिलला घेराव घातल्यामूळे काहीकाळ तहसिल परिसर दनानून गेला.दिलेली मदत सरसकट देण्यात यावी ही मागणी पुरग्रस्तांना कडून करण्यात आली.

सदर दिलेली चेक स्वरुपातील सानुग्रह मदत ही गावनमूना ८ धारकांना व अतिनूकसान ग्रस्त पंचनामा यादी नुसार देण्यात आली असून त्यात पंचनामा किंवा इतर बाबतीत काही तफावत असल्यास त्याची चौकसी करण्यात येईल व शक्य तेवढी सर्वतोपरी पुरग्रस्तांना मदत करण्यात येईल.

तहसिलदार सेलोटकर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close